Best 100+ Life Marathi Suvichar with Images
नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण “Life Marathi Suvichar with Images” पाहणार आहोत, हे सुविचार आपल्याला कधी सुखात, कधी दुःखात तर कधी स्वतःला उभं करण्यासाठी मदत करतील.
Life Marathi Suvichar with Images

“अज्ञानी व्यक्तीला सहा प्रकारे ओळखता येते. विनाकारण रागावणे, लाभाशिवाय बोलणे, प्रगतीशिवाय परिवर्तन करणे, विनाकारण विचारपूस करणे, अपरिचित व्यक्तीवर विश्वास ठेवणे आणि शत्रूला मित्र मानणे.”

“कंजूस व्यक्तीने जमिनीत पुरलेले धन तेव्हाच बाहेर
काढता येते जेव्हा कंजूस व्यक्ती जमिनीत गाडला जातो.”

“उदार हृदय असलेली व्यक्ती आयुष्यभर आनंदाने जगते,
तर कंजूस हृदयाची व्यक्ती आयुष्यभर दुःखी अंतःकरणाने जगते.”

“रागाचे वादळ नेहमीच विवेकाचा नाश करणारे असते.”

“जर शिक्षक भ्रष्ट असेल तर संपूर्ण जग भ्रष्ट होईल.”

“संतपुरुष शंभर युगांचे शिक्षक आहेत.”

“जर चिंताच करायची असेल तर चरित्र किंवा प्रगतीची करा.”

“तुम्ही उद्याच मरणार आहात असे समजून जीवन
जगा आणि कधी मरणार नाही असे समजून कार्य करा.”

“ज्ञान हृदयात राहते पुस्तकात नाही.”

“निष्क्रिय गंभीर ज्ञानापेक्षा सक्रिय माहिती श्रेष्ठ आहे.”

“ज्याच्याजवळ धीर आहे आणि जो कष्टाला घाबरत नाही,
यश त्याची दासी बनून त्याच्या जवळ राहते.”

“विनयशील व्यक्तीला अनेक आमंत्रणे मिळतात आणि अश्या व्यक्ती सर्वांना प्रिय असतात.”

“आत्मविश्वास, दृढता आणि वैराग्य हे तीन गुण ज्यांच्यात
असतात ते लोक नेता होण्याच्या योग्यतेचे असतात.”

“तलवार एकमेळ मारेल; पण उपकार वेळोवेळी मारेल.”

“मनःशांतीकरिता मी चारी दिशेला फिरले; पण एका कोपऱ्यात बसून
चांगले पुस्तके वाचल्यामुळे मला जी शांती मिळाली,
जे समाधान मिळाले, ते इतरत्र कुठेच मिळाले नाही.”

“पुस्तकालय म्हणजे ज्ञानाची पाणपोई आहे.”

“तुम्ही प्रतिष्ठेयोग्य व्हा आणि त्यानंतर जर तुम्हाला प्रतिष्ठा नाही मिळाली तर काही हरकत नाही;
परंतु तुम्ही पात्र नसतानाही तुम्हाला प्रतिष्ठा मिळाली तर ते घातक आहे.”

“माझी वाचा, माझे मन, आणि माझे अंतःकरण पवित्र राहावे याकरिता मी प्रार्थना करत आहे.
शेवटी ‘तुला’ सर्व माहीतच आहे आणि माझ्याकरिता जे यश आहे ते तू पाठवणारच आहेस.”

“शत्रुत्वामध्ये बंधन आहे आणि मैत्रीमध्ये संधान आहे.”

“पुरुषार्थ व्यक्ती करते; पण फळ भाग्य देते.
समुद्रमंथनात विष्णूला लक्ष्मी मिळाली, तर शिवशंकराला विष.”
Sundar Vichar Marathi

“नशीबवान व्यक्तीला समुदातही फेकून दिले,
तर तो तोंडात मासा घेऊन बाहेर येईल.”

“एक ठिकाणी जो शब्द शिवी ठरतो दुसऱ्या ठिकाणी तोच शब्द बोलीभाषा असतो.”

“दुसऱ्यांचे अदृश्य दोषही लोक सहज शोधतात;
परंतु स्वतःचे दोष समोर दिसत असून लोक त्याकडे पाहत नाहीत.”

“आळशी मन सैतानाचे घर असते.”

“माणसामाणसात अंतर आहे. कोणी हिरा आहे,
तर कोणी गारगोटी आहे.”

“असे कोणतेच अक्षर नाही ज्याचा मंत्र होत नाही. अशी कोणती मुळी नाही ज्याचे औषध बनत नाही.
अशी कोणतीच व्यक्ती नाही जिच्यात कोणताच गुण नाही.
फक्त या सर्वांचा उपयोग करू शकेल अशी व्यक्ती शोधून काढणेच कठीण आहे.”

“परदेशात विद्या, घरात पत्नी, आजारपणात औषध आणि मृत्युशय्येवर
असलेल्या व्यक्तींकरिता त्यांच्याकडून केले गेलेले सत्कर्म हेच मित्र आहेत.”

“जेव्हा सर्वजण तुमच्या अंगणातून तुम्हाला सोडून निघून जातात तेव्हा
तुमच्या अंगणात येऊन उभा राहणाराच तुमचा खरा मित्र असतो.”

“बुद्धिमान लोक गेलेल्या क्षणांचे दुःख करत नाहीत. भविष्याचीही ते चिंता करत नाहीत;
परंतु ते वर्तमानावर लक्ष ठेऊन ते योग्य वर्तन करतात.”

“बोलल्या न गेलेल्या शब्दांचे तुम्ही मालक असता
आणि बोलल्या गेलेल्या शब्दांचे तुम्ही गुलाम होता.”

“हत्ती विकून टाकल्यानंतर त्याच्या अंकुशावर वाद घालणे मूर्खपणाचे आहे.”

“स्वार्थी होण्यापेक्षा भांडखोर असणे अधिक चांगले.”

“लग्न असा जुगार आहे ज्यात पुरुष स्वतःची स्वतंत्रता
आणि स्त्री स्वतःची प्रसन्नता डावावर लावते.”

“चांगल्या स्त्रीसोबत विवाह म्हणजे जीवनाच्या वादळात शांती आणि
वाईट स्त्रीसोबत विवाह म्हणजे जीवनातल्या शांतीत वादळ येणे.”

“एकदा विवाह करणे कर्तव्य आहे, दुसऱ्यांदा करणे
चूक आणि तिसऱ्यांदा करणे शुद्ध वेडेपणा आहे.”

“आहार आणि व्यवहारात स्पष्ट राहणार नेहमी सुखी असतो.”

“आमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली असलेल्यांचे आम्ही भक्त होतो,
तर कमकुवत असलेल्यांचे आम्ही यमराज बनतो.”

“महापुरुष संकल्प करतात, तर साधारण व्यक्ती इच्छा करतात.”

“जेव्हा खरा शिष्य तयार होतो तेव्हा त्याला चांगला गुरु भेटतोच.”

“या पृथ्वीवर दानासारखे उत्तम कार्य नाही, प्रलोभनासारखा दुसरा कोणता शत्रू नाही,
चांगल्या स्वभावासारखे दुसरे कोणतेच आभूषण नाही आणि समाधानासारखे दुसरे कोणतेच धन नाही.”
Changle Vichar Marathi

“वेळ आणि समुद्राची भरती कधी कोणाची वाट पाहत नाही.”

“आपल्या स्वार्थाकरिता या जगात कोणीच जगात नाही;
परंतु जो परोपकाराकरिता जगतो तोच खऱ्या अर्थाने जीवन जगतो.”

“नष्ट झालेले वैभव सशक्त शरीराद्वारे पुन्हा मिळवता येते;
परंतु क्षीण झालेले शरीर वैभवाद्वारे पुन्हा मिळवता येत नाही.”

“जसा एकाच चाकावर रथ चालत नाही;
तसेच पुरुषार्थ आणि स्त्रीशिवाय भाग्यही साथ देत नाही.”

“धनसंपत्तीचा उदय मांगल्याने होतो, चातुर्याने ती वाढते,
नैपुण्याने स्थिर होते आणि संयमामुळे कायम राहते.”

“आवश्यकता ही आविष्काराची जननी आहे.”

“हास्य हा सर्वांत मोठा सद्गुरू आहे.”

“ओठावर हसू आणण्यास जो असमर्थ आहे, त्याने व्यवसाय करू नये.”

“स्तुती चांगल्या व्यक्तींना अधिक चांगले बनवते,
तर खराब व्यक्तींना अधिक खराब बनवते.”

“फळाची चव घेतल्याशिवाय वृक्षाबाबत काही बोलू नये.”

“क्षमा हे शस्त्र हाती असलेल्या व्यक्तीस दुर्जन काहीच करू शकत नाहीत;
कारण गवत नसलेल्या जागी पडलेला विस्तव आपोआपच शांत होतो.”

“सज्जन हे नारळासारखे बाहेरून खडबडीत, कठीण दिसतात;
पण आतून मधुर असतात, मात्र दुर्जन बोराप्रमाणे केवळ बाहेरूनच रमणीय दिसतात.”

“घोड्याचा वेग, हत्तीचे मदमस्त असणे, स्त्रीचे
चातुर्य आणि उद्योग हे खऱ्या पुरुषाचे लक्षण आहे.”

“मध, दही, द्राक्षे, अमृत सारेच गोड असते; परंतु या वस्तू मधुर
असल्या तरी ज्याचे मन जेथे जडते तेच त्याला प्रिय वाटते.”

“कुणाची कृपा भागणे म्हणजे आपले स्वातंत्र्य गमावणे असते.”

“आश्चर्य वाटणे हीच तत्वज्ञानाची पहिली ओळ आहे.”

“इतरांच्या खूप गोष्टी ऐका; परंतु आपल्या गोष्टी इतरांना थोड्याच सांगा.”

“घोडे चोरीला गेल्यावर तबेल्यास कुलूप लावण्यास काहीच अर्थ नसतो.”

“आलेली संधी आणि वेळ तत्काळ घट्ट पकडून ठेवण्यातच शहाणपणा असतो.”

“महान आत्म्यांची इच्छा शक्तिरूप असते,
तर दुर्बल आत्म्यांची इच्छा फक्त इच्छाच असते.”

“विज्ञानावर शहाणपणाचे नियंत्रण नसेल, तर ते भ्रमिष्टसारखे वागेल.”

“संधी क्वचितच दुसऱ्यांदा मिळते. मिळालेल्या संधीचा वेळीच फायदा घ्या.”

“तुमच्या मित्राच्या गुन्ह्यात तुमचा सहभाग असणे
म्हणजे तुम्हीच तो गुन्हा करण्यासारखे आहे.”

“आनंद वाटून घेतल्याने दुप्पट होतो आणि दुःख घेतल्याने निम्मे होते.”
Conclusion
आम्हाला आशा आहे की, “Life Marathi Suvichar with Images” तुम्हाला रोजच्या जीवनात प्रेरणा देतील आणि हा लेख तुम्हाला नक्की आवडला असेल. हे सुविचार आपल्याला प्रियजनांसोबत नक्की शेअर करा.
प्रेरणादायी सुविचारांची “Deep Meaningful Good Morning Life Quotes” ला भेट द्या.
वेगवेगळ्या सॅलड्स साठी आणि नुट्रीशनल टिप्स साठी Nutribowl ला भेट द्या.
FAQs
“Life Marathi Suvichar with Images” कशासाठी उपयोगी आहेत?
हे सुविचार तुम्हाला रोजच्या आयुष्यात प्रेरणा, आनंद आणि सकारात्मकता आणल्यास मदत करतात.
“Life Marathi Suvichar with Images” हे सुविचार कोणत्या क्षणासाठी आहेत?
हे सुविचार सकाळच्या शुभेच्छांसाठी, तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी आहेत.