Best 100+ Inspiring Self Respect Chanakya Quotes in Marathi
“Self Respect Chanakya Quotes” तुम्हाला यशासाठी प्रेरणा देईल आणि जीवनातील अडचणींशी लढण्याचे बळही देईल. चाणक्य हे प्राचीन भारतातील ज्ञानी आणि हुशार विद्वान होते. ते एक महान विचारवंत आणि सल्लागारही होते.
आपल्या तीक्ष्ण मनाने आणि व्यावहारिक सल्ल्याने, त्यांनी मौर्य साम्राज्य निर्माण करण्यास मदत केली आणि त्यांचा राजा चंद्रगुप्त मौर्य याला महान गोष्टी साध्य करण्यासाठी मार्गदर्शन केले. शेकडो वर्षांनंतरही चाणक्याची शिकवण आजही उपयुक्त आणि अर्थपूर्ण आहे. “चाणक्य”, ज्यांना विष्णु गुप्त आणि कौटल्य या नावानेही ओळखले जाते, ते भारतातील विद्वानांपैकी एक होते.
Self Respect Chanakya Quotes

“एक सद्गुण सगळ्या दोषांना झाकून टाकतो.”

“चंद्र-सूर्य पापी माणसालाही प्रकाश देतातच,
तदवतच सज्जन माणसे ही अवगुणी लोकांवर दया दाखवतात.”

“प्रेम करणारा शेजारी दूर राहणाऱ्या भावापेक्षा अधिक चांगला असतो.”

“शांततेसारखे दुसरे कोणतेच तप नाही, समाधानापेक्षा मोठे कोणतेच सुख नाही,
लोभापेक्षा कोणताच मोठा आजार नाही आणि दयेसारखा दुसरा कोणताच धर्म नाही.”

“भाग्याचा दरवाजा उघडण्याची किल्ली म्हणजे कठोर परिश्रम होय.”

“सगळ्या धनात विद्या मुख्य आणि सर्वश्रेष्ठ धन आहे.”

“जेथे सन्मान मिळत नाही, जगण्याचे काही साधन नाही, जिथे आपले बंधू-भगिनी नाहीत आणि
जिथे तुम्हाला कोणतीच विद्या मिळणार नसेल, अश्या ठिकाणी कदापि राहू नये.”

“उद्योगाचे दारिद्र्य राहत नाही. आत्मचिंतनाने पाप राहत नाही. शांत राहिल्याने भांडण होत नाही,
तर सावध राहिल्याने भीती राहत नाही.”

“समृद्धी ही व्यक्तिमत्वाची देणगी आहे, भाग्याची नाही.”

“कोट्यवधी रुपये दिले तरी जीवनातला गेलेला एकही क्षण परत मिळत नाही.”

“दुसऱ्याचे ऐका; पण स्वतःचा निर्णय गुप्त ठेवा.”

“एकतेत शक्ती आहे. विखुरलेल्या हजारो गवताच्या पात्यांना हत्ती तुडवतो;
पण तीच गवताची हजार पाती एकत्र आली तर हत्तीवर अंकुश ठेऊ शकतात.”

“ईर्ष्या अपयशाचे कारण आहे. ईर्ष्या केल्याने आपलेच महत्व कमी होते.”

“ज्याप्रमाणे सोन्यात जडवलेले रत्ना अत्यंत सुंदर दिसते त्याप्रमाणे
विवेकाच्या कोंदणात मनुष्यरूपी रत्न सुंदर दिसते.”

“मित्र व मंत्रावर कधीही अविश्वास दाखवू नये. मित्रावर अविश्वास दाखविल्याने
मैत्री तुटते व मंत्रावर अविश्वास दाखविल्याने शक्ती कुंठित होते.”
Chanakya Quotes in Marathi for Success

“सापाच्या दातात, माशीच्या डोक्यात आणि विंचवाच्या शेपटीत विष असते,
मात्र दुर्जनांच्या अंगोपांगात विष असते.”

“काही करण्याची प्रेरणा होणे, तोच उचित मुहूर्त असतो. ती वेळ टळली तर यशही टळते.”

“कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुद्धा बाकी ठेऊ नये.”

“विचारातून हेतू स्पष्ट होतात. हेतूमुळे कृतीला चालना मिळते. त्याची सवय झाली की तो स्वभाव बनतो.
कृतिशील स्वभाव बनला की, साध्य प्राप्त करता येते. म्हणजे विचार हीच यशप्राप्तीची पहिली पायरी होय.”

“तुमची गुपिते कधीच कोणाला सांगू नका. ती तुम्हालाच भस्मसात करतील.”

“शिक्षण हा मनुष्याचा सर्वाधिक चांगला मित्र आहे; कारण उच्चशिक्षित मनुष्य हा सर्वत्र पूज्य असतो.
तारुण्य आणि सौंदर्य यावर मात करण्याची ताकद शिक्षणात असते.”

“भीती तुमच्या जवळ यायला लागली की, तिच्यावर जोरदार हल्ला करा. ती आपोआप नष्ट होईल.”

“जे लोक संतोषरुपी अमृताने तृप्त असतात, त्यांनाच त्वरित सुख आणि शांतीची प्राप्ती होत असते.”

“एक गुणवान पुत्र शेकडो मूर्ख पुत्रांपेक्षा चांगला आहे. एकच चंद्रमा अंधाराला नष्ट करतो;
पण हजारो तारे असे करू शकत नाही.”

“ज्यांच्याजवळ धन आहे. त्यांचे पुष्कळ मित्र, भाऊ-बंधू आणि नातलग असतात.”

“दुधात टाकलेल्या पाण्यालाही दूध म्हणतात; तसेच गुणवान व्यक्तीसोबत राहणाराही गुणी होतो.”

“शत्रूच्या कमकुवत बाजू जोपर्यंत कळत नाहीत तोपर्यंत कृत्रिम आदर आणि प्रेम दाखवून त्याला जिंकावे.”

“आळशी आपले काम उद्यावर ढकलत असतो. उद्या कधीही येत नाही.
त्यामुळे तो वर्तमानासोबत आपले भविष्यही नष्ट करीत असतो.”

“ज्ञान हे नेहमी कामधेनूसारखे असते. ते एकदा प्राप्त केले की, त्याचे फळ कोठेही प्राप्त करता येते.”
Conclusion
“Self Respect Chanakya Quotes” आपल्याला सांगते की जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्याला योग्य मार्ग आणि प्रेरणा आवश्यक आहे
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हे “Self Respect Chanakya Quotes” लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्ही तुमची स्वप्ने सत्यात उतरवू शकाल.
जर तुम्ही मराठीमधे पतीसाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेछ्यांच्या शोधात असाल, तर “Happy Marriage Anniversary Wishes in Marathi“.
वेगवेगळ्या सॅलड्स साठी आणि नुट्रीशनल टिप्स साठी Nutribowl ला भेट द्या.
FAQs
चाणक्य नीती चा अर्थ काय आहे?
चाणक्य नीती हा चाणक्याने लिहिलेल्या प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचा आणि जीवनाच्या मूलभूत तत्त्वांचा संग्रह आहे.
चाणक्य नीती मधून आपण काय शिकतो?
ही धोरणे नैतिकता, व्यवस्थापन, यश आणि नेतृत्व याबद्दल प्रेरणादायी विचार देतात.
चाणक्य नीति कोणत्या भाषेत डाउनलोड करता येईल?
चाणक्य नीति हे मूळतः संस्कृतमध्ये लिहिलेले आहे, परंतु हिंदीसह अनेक भाषांमध्ये अनुवादित केले आहे.